दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा >> मराठीतून शुभेच्छा पत्र पाठवा

Thursday, November 4, 2010 0 comments


आपल्या नातेवाईक आणि  मित्र-मंडळीना मराठीतून शुभेच्छा पत्र पाठवा 

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा  >> मराठीतून शुभेच्छा पत्र पाठवा

Read the full story

, , , ,

दीपावली उत्सवाचे स्वरूप - दिवाळी (दीपावली)

Tuesday, November 2, 2010 0 comments


१. अर्थ :
२. दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र :
३. मराठीत शुभेच्छा पत्र पाठवा

http://balsanskar.com/marathi/lekh/410.html Read the full story

, , , ,

भाऊबीज (यमद्वितीया) - दिवाळी (दीपावली)


कथा व विधी :
या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.' एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळतात. अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी व यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास

http://balsanskar.com/marathi/lekh/403.html Read the full story

, ,

फटाक्यांचे दुष्परिणाम - दिवाळी (दीपावली)


१. शारीरिक :

भाजणे, कानाचा बहिरेपणा, फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन अनेक जण भाजून मृत्यू पावणे इत्यादी.

२. भौतिक :

काही वेळा बाणासारख्या फटाक्यांमुळे गवताची झोपडी, गंजी वगैरे पेटणे.

३. आर्थिक :

देश आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर असतांना दरवर्षी कोट्यवधी रुपये फटाक्यांसाठी जाळून टाकणे, हे पापच आहे.
>>>>>>>>>

http://balsanskar.com/marathi/lekh/401.html Read the full story

, ,

दिवाळी निम्मित सात्विक रांगोळ्या - दिवाळी (दीपावली)





More >>>> http://balsanskar.com/marathi/lekh/434.html Read the full story

,

दिवाळीत किल्ला का बांधतात ? - दिवाळी (दीपावली)


किल्ला बांधणे म्हणजे काय ?
लहान मुलेच किल्ला का बांधतात ?
किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात ?

http://balsanskar.com/marathi/lekh/411.html Read the full story

, , , , , , , ,

नवरात्र व्रताशी संबंधित कृतींचे शास्त्र व देवीपूजनाच्या काही नेहमीच्या कृती

Thursday, October 7, 2010 0 comments


नवरात्र व्रताशी संबंधित कृतींचे शास्त्र : घटस्थापना,अखंड दीपप्रज्वलन करणे,नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे,
देवीपूजनाच्या काही नेहमीच्या कृती : नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे,देवीची आरती करणे, ....>>>>> Read the full story

नवरात्रीविषयक ध्वनिचित्रपट

Wednesday, October 6, 2010 0 comments

Read the full story

श्री गणेश चतुर्थी

Wednesday, September 8, 2010 0 comments



प्रथम गणेशपूजन का करतात ?
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?
पूजेत डाव्या सोंडेचा गणपति का ठेवावा ?
श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावित ?

Read More >>>>>>>> http://balsanskar.com/marathi/lekh/156.html Read the full story

गणपतीची आरती कशी करावी ?



१. आरती सुरू करण्यापूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.

२. अर्थ समजून घेऊन आरती म्हणावी.

३. आरतीतील शब्दोच्चार अध्यात्मदृष्ट्या योग्य असावेत.

>>>>>>> http://balsanskar.com/marathi/lekh/360.html Read the full story

अष्टविनायक



अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देऊळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व >>>>>>>> Read the full story

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunday, August 15, 2010 0 comments


स्वातंत्र्यदिना निमित्त आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा पत्र पाठवा !
http://balsanskar.com/marathi/lekh/318.html


`बालसंस्कार' तर्फे सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 
Read the full story

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

Saturday, August 14, 2010 0 comments


देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, >>>>>
http://balsanskar.com/marathi/lekh/331.html 
Read the full story

स्वातंत्र्य दिन

Friday, August 13, 2010 1 comments


कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातन्त्र्यसैनिकांना >>>>>   



http://balsanskar.com/marathi/lekh/318.html

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

http://balsanskar.com/marathi/lekh/331.html
 

राष्ट्रध्वजाचा मान राखा !

 

http://balsanskar.com/marathi/lekh/331.html#1

 
Read the full story

, ,

टेंब्येस्वामी : श्री वासुदेवानंद सरस्वती पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

Sunday, July 11, 2010 0 comments


श्री वासुदेवानंद सरस्वती हे श्री. टेंब्येस्वामी या नावानेदेखील ओळखले जात. त्यांचे खरे नाव वासुदेव असे होते;
तर >>>>>>>

Read the full story

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

Saturday, July 3, 2010 0 comments


तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक : स्वामी विवेकानंद
* जन्म, बालपण व शिक्षण
* गुरुभेट व संन्यासदीक्षा
* धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात : रामकृष्ण मठाची स्थापना
* स्वामी विवेकानंद यांनी गाजवलेली सर्वधर्मपरिषद शिकागोला जाण्याविषयी पूर्वसूचना
* शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचा सहभाग    >>>>>>>>

येथे वाचा :  http://balsanskar.com/marathi/lekh/113.html Read the full story

दादाभाई नौरोजी स्मृतिदिन - ३० जून

Sunday, June 27, 2010 0 comments



दादाभाई नौरोजी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय म्हणून ते गणले जातात. ‘ज्ञानप्रप्रसार सभा’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली >>>>>>>>>>>>>>

Read the full story

एकाग्रतेचे महत्त्व

Saturday, June 26, 2010 0 comments

कलकत्त्यातील सिमोलिया पथावर एक मोठे घर होते. त्या घरात विश्वनाथबाबू दत्त नावाचे एक नावाजलेले अधिवक्ता (वकील) रहात होते. त्यांची कीर्ती कलकत्त्यातच नव्हे,  तर बंगालमध्ये गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र पोहोचलेली होती. त्यांच्या पत्नीचे नाव होते भुवनेश्वरीदेवी. आपल्याला मुलगा व्हावा; म्हणून भुवनेश्वरीदेवी काशीला गेल्या अन् काशीविश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागल्या. एके दिवशी भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि दृष्टांत देऊन `तुझी मनोकामना पूर्ण होईल',  असा आशीर्वाद त्यांना दिला.
          पुढे कलकत्त्यास आल्यावर काशीविश्वेश्वराच्या कृपेने त्यांना मुलगा झाला. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. १२.१.१८६३ मध्ये विश्वेश्वराच्या कृपेने मुलगा झाला; म्हणून त्याचे नाव ठेवले विरेश्वर. त्याची आई त्याला प्रेमाने `बिले' म्हणायची. त्याचे दुसरे नाव `नरेंद्र' होते.
            बिले लहानपणापासूनच देवभक्त होता. लहान असतांना शिवाचा जप तो एकाग्रपणे करत असे. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता लहानपणापासूनच नरेंद्रामध्ये होती. नरेंद्र आणि त्याचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता. तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्राच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले; म्हणून भुवनेश्वरीदेवी येऊन पहातात तो काय ? नरेंद्र तसाच शांतपणे डोळे मिटून बसलेला! साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता. इतके त्याचे मन एकाग्र झाले होते.
          एकदा अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्यावर काही मंडळी एक खेळ खेळत होती. तो खेळ असा होता की, समोर येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवर नेम धरून मारणे. चेंडू सततच हालत असल्यामुळे तेथील कुणालाच ते व्यवस्थित जमत नव्हते. एक भारतीय युवक तेथून चालला होता. त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवर आपला नेम अचूक मारून दाखवला. तो युवक अर्थात् नरेंद्र दत्त होता ! तेथील अमेरिकन मंडळींनी ते पाहून आश्चर्य व्यक्त केले. `हे त्यांना कसे जमले', या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देतांना विवेकानंदांनी त्यांना एकाग्रतेचे महत्त्व पटवून दिले. केवळ एकाग्रतेनेच हे साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.


          मुलांनो, बाण मारतांना अर्जुनाची दृष्टी केवळ त्याच्या लक्ष्यावर केंद्रित असे, हे तुम्हाला ठाऊक आहेच ना ? एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, ती लक्षपूर्वक करण्याची तळमळच कुठल्याही गोष्टीच्या यशस्वितेला कारणीभूत ठरते. हीच तळमळ पुढे नरेंद्रालाही ईश्वरप्राप्तीच्या साधनेत उपयोगी पडली. त्यायोगे ते नरेंद्राचे स्वामी विवेकानंद होऊ शकले.


तात्पर्य : बालमित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनाची शक्ती प्रचंड असते. मनाची एकाग्रता साध्य करणे हा त्याचा पहिला टप्पा आहे. जास्तीतजास्त लक्षपूर्वक केलेले काम अल्प वेळात होऊन जास्त यश मिळवून देणारे असते. मन एकाग्र करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने आपल्या मनातले इतर विचार अल्प होऊन एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित व्हायला साहाय्य होते. अभ्यास करतांनाही याचा लाभ होतो. म्हणूनच मित्रांनो, आतापासूनच आपण नामाला प्रारंभ करूया. मग यशोमंदिराचा कळस आपण नक्कीच गाठू शकू.




संबंधित लेख

» धर्मवीर संभाजीराजे !
» `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच', असे इंग्रजांना सांगणारे लोकमान्य टिळक !
» क्रांतीवीर बाबाराव सावरकर !
» देशभक्‍त डॉ. नारायण दामोदर सावरकर !

Read the full story

शिवराज्याभिषेक

Tuesday, June 22, 2010 0 comments


श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना >>>>

http://balsanskar.com/marathi/lekh/198.html Read the full story

,

बालपणापासूनच अलौकिकत्व अंगी असलेले (आद्यगुरु) शंकराचार्य

Monday, May 17, 2010 1 comments

           बालमित्रांनो, भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग पुढे दिला आहे. सात वर्षे वयाच्या शंकराच्या प्रकांड पांडित्याची आणि ज्ञानसामर्थ्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. ती केरळचा राजा राजशेखर याच्या कानी गेली. राजा शास्त्रअध्ययनात आवड असणारा, विद्वान,  ईश्वरभक्त, श्रद्धावान आणि पंडितांचा आदर करणारा होता. यामुळे या बालकाला पहाण्याची आणि भेटण्याची तीव्र इच्छा राजाच्या मनात उत्पन्न झाली.          राजा राजशेखर याने आपल्या प्रधानाला हत्तीची भेट घेऊन शंकराकडे पाठवले आणि त्याला राजवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले. हत्ती घेऊन प्रधान शंकराच्या घरी आला आणि नम्रतेने त्याने राजाचा निरोप सांगितला. निरोप ऐकून शंकर त्याला म्हणाला, ''उपजीविकेसाठी भिक्षा हेच ज्याचे साधन आहे, त्रिकाळ संध्या ईश्वरचिंतन, पूजा-अर्चा आणि गुरुसेवा हीच ज्याच्या जीवनाची नित्य 
व्रते आहेत, त्याला आपल्या या हत्तीचा काय उपयोग आहे ? चार वर्णातील सर्व कर्तव्यांचे पालन करून ब्राह्मणादी धर्ममय जीवन जगू शकतील, अशी व्यवस्था करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. माझा हा निरोप आपल्या स्वामींना सांगा.''          राजाला दिलेल्या या निरोपासह राजवाड्यात येण्याचे राजा राजशेखरचे निमंत्रणही त्याने स्पष्टपणे नाकारले. या उत्तराने राजा अधिकच प्रसन्न झाला. त्याच्या मनात शंकराविषयी श्रद्धा अधिकच तीव्र झाली आणि एक दिवस प्रधानाला समवेत घेऊन राजा स्वत:च कालडी येथे शंकराच्या दर्शनास आला. राजाने पाहिले, एक तेज:पुंज बालक समोर बसला आहे. त्याच्या चोहोबाजूस बसून ब्राह्मण वेदाध्ययन करत आहेत.          राजाला पहाताच शंकराने त्याचे नम्रतेने, सन्मानपूर्वक स्वागत केले. त्याच्याशी झालेल्या चर्चेतून शंकराचे अगाध पांडित्य आणि अलौकिक विचारशक्ती लक्षात आली. जातांना त्याने काही सोन्याच्या मुद्रा शंकराच्या चरणी अर्पण केल्या आणि त्या स्वीकारण्याची त्याला विनंती केली. शंकर राजाला म्हणाला, ``महाराज, मी ब्राह्मण आहे, तसाच ब्रह्मचारी आहे. यांचा मला काय उपयोग ? आपण देवपूजेसाठी जी भूमी दिली आहे, तेवढी मला आणि माझ्या आईला पुरेशी आहे. आपल्या कृपेमुळे मला कशाचीच कमतरता नाही.''          शंकराच्या या उत्तरापुढे काय बोलावे, हे राजाला सुचेना. शेवटी हात जोडून तो म्हणाला,''आपल्या दर्शनाने मी धन्य झालो; पण एकदा जी वस्तू अर्पण केली, ती मला परत घेता येणार नाही, तरी आपण हे धन योग्य अशा व्यक्तीला वाटून टाकावे.'' सुहास्य मुखाने शंकर लगेच म्हणाला, ''महाराज, आपण राजे आहात. कोण सुपात्र, कोण योग्य याचे ज्ञान आपल्याला अवश्य असलेच पाहिजे. माझ्यासारख्या ब्रह्मचाऱ्याला हे ज्ञान कोठून असणार ? विद्यादान हा ब्राह्मणाचा धर्म आणि सत्पात्री दान करणे हा राजधर्म आहे. तेव्हा आपणच योग्य आणि सत्पात्र व्यक्ती निवडून हे धन वाटून टाका.''          राजा निरुत्तर झाला. त्याने शंकराला वंदन केले आणि तेथे असलेल्या ब्राह्मणांना ते धन वाटून टाकले.
          मुलांनो, निरपेक्षपणे विद्यादान करण्याचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल. आपणही असे करू शकतो. ज्या विषयाचे ज्ञान आपल्याला अधिक आहे, तो विषय दुसऱ्याला येत नसेल, तर आपण त्याला साहाय्य करू शकतो.

Read the full story

" बालसंस्कार " तर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Friday, April 30, 2010 0 comments



Read the full story

क्रांतीकारक दामोदर चापेकर आणि अनंत कान्हेरे बलीदान दीनानिमित्त विनम्र अभिवादन !

Saturday, April 17, 2010 0 comments

Read the full story

,

" बालसंस्कार " तर्फे सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !

Monday, March 29, 2010 0 comments



तिथी

काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.....

जन्माचा इतिहास......

उत्सव साजरा करण्याची पद्धत......

http://balsanskar.com/marathi/lekh/111.html

Read the full story

,

' बालसंस्कार ' तर्फे हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Tuesday, March 16, 2010 0 comments

' बालसंस्कार ' तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.

' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?
स्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !
आपल्या पाल्याच्या यशस्वी जीवनासाठी !
मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी !
सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी !


अवश्य भेट द्या : www.balsanskar.com
 
Read the full story

छत्रपती शिवाजी महाराज

Tuesday, March 2, 2010 1 comments


छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी


- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,
- पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,
- साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,
- स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,
- योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला,
- आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था... अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;
- राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.
- तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.

या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात!

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते. Read the full story

संत श्री ज्ञानेश्वर

Thursday, January 14, 2010 0 comments

‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत। तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत।।’
- श्रीस्वरूपानंद स्वामी
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ७२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!

ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, मती गुंग करून टाकणारी अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.

‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’

`प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.

‘शूचीनाम श्रीमतां गेहे, योगभ्रष्टोऽभिजायते’ (भगवद् गीता ६.४१) अशा पवित्र कुळात त्यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. श्री विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. श्री निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. अलंकापुरी (आळंदी) हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले. त्यांचे वडीलबंधू कृपासिंधू निवृत्तीनाथ हे भावंडांचे सर्वेसर्वा होते.

श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशीर्वादाने भगवद् गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. (संत ज्ञानेश्र्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली.) या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. ज्ञानेश्वरीबद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी साहित्य वजा (-) ज्ञानेश्वरी बरोबर (=) शून्य’. तर संत नामदेव महाराज म्हणतात,

‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।’

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकर्‍यांची त्रिकाल संध्याच होय. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, असेच हरिपाठ सांगतो. भक्तीला ज्ञानेश्वरांनी पंचम पुरुषार्थ मानले आहे. ‘कर्मे ईशु भजावा’ हाच त्यांचा कर्मयोग व भक्तियोग आहे. त्यांच्या वाङ्मयाला परतत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे विशेष!

`ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय! निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक संत ज्ञानेश्वरांचे व त्यांच्या साहित्याचे वर्णन करतात.

‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर संजीवन समाधीनंतरच्या वातावरणाचे वर्णन पुढील यथार्थ शब्दांत करतात. -

‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’,
वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’
Read the full story

समर्थ रामदास

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे।
कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।

परमार्थ, स्वधर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, संघटन, प्रबोधन, समाजकारण, राजकारण, प्रपंच, काव्य, साहित्य, बलोपासना अशा अनेक विषयांचे सर्वस्पर्शी कर्ते, भाष्यकार आणि द्रष्टे, पुरोगामी राष्ट्रसंत म्हणजे समर्थ रामदास स्वामी!

श्री समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे ठोसरांच्या घरात झाला. हे सूर्योपासक घराणे होते. समर्थांचे पाळण्यातले नाव नारायण. बालपणापासून नारायण आपल्या विचारांनी, आचारांनी असामान्य वाटत होता. नारायणाने लग्नाच्या बोहल्यावरून आत्मोध्दारासाठी नाशिक पुण्यक्षेत्री धाव घेतली. दक्षिण गंगा गोदावरीचा पावन परिसस्पर्श अनुभवला व प्रभू श्रीरामचंद्राचे सान्निध्यही अनुभवले. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण व रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले.

‘धर्म संस्थापना जगजीवना। भरतखंडी करणे असे।’ यासाठी त्यांनी कठोर तपाचरण केले. टाकळी येथे संगमावर १२वर्षे तपाचरण केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र धारण केला. भारतभर तीर्थयात्रा केल्या. संपूर्ण देश पाहून परिस्थितीचा अंदाज घेतला. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.

समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -

प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।

समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात.

परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,

बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।

मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,

‘येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’

असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन्‌ त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये! विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना पण त्यांचे काव्य सहज मुखोद्गत होते. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक वचन हे स्वानुभवातून आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा खरे तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.

विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ‘दासबोधा’ चे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या) समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली.

जय जय रघुवीर समर्थ!

समर्थांचे वाङ्‌मय:
`श्रीमत्‌ ग्रंथराज दासबोध' या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी.
काही स्‍फूटरचना, भीमरूपी, मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या .
Read the full story

शिवाजी महाराजांचा चित्रमय इतिहास !

Sunday, January 10, 2010 1 comments















Read the full story